1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. robbery-in-mumbai-delhi-rajdhani

सर्वात सुरक्षित राजधानी एक्स्प्रेसवर दरोडा लाखोंची चोरी

देशातील सर्वाधील प्रसिद्ध आणि सुरक्षित असलेल्या राजधानी  एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. यामध्ये त्यांनी   प्रवाशांकडील लाखोंचा ऐवज लुटला आहे. यामध्ये ही राजधानी एक्स्प्रेस  मुंबईहून दिल्लीला जात होती. तेव्हा  एक्स्प्रेसमधील सात डब्यातील 20 प्रवाशांकडील रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. यामध्ये कोच नंबर 3, 5, 6, 7, 10, 11 आणि A-1  मध्ये रतमल ते कोटा या दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली आहे. यामध्ये चोरांनी प्रवाशांना त्यांच्या बॅग पँट्री कार आणि बाथरुममध्ये  फेकून दिल्या होत्या.  ट्रेन दिल्लीला पोहोचल्यानंतर हजरत निजामुद्दीन स्टेशनवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील लेख
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी चालवले नद्यांना पुनर्जीवित करण्याचे राष्ट्रीय नदी अभियान - भरताचा कल्याण