गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑगस्ट 2017 (17:18 IST)

वेमुलाने विद्यापीठ प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या केली नाही

रोहिल वेमुला आत्महत्या प्रकरणाचा अहवाल बुधवारी न्यायालयीन समितीकडून सादर करण्यात आला. या समितीने रोहित वेमुला हा दलितच नव्हता आणि त्याने विद्यापीठ प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या केली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे.याशिवाय न्यायालयीन समितीने रोहित वेमुलावर दबाव आणल्याचा आरोप असलेल्या माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजप नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीटही दिली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या या एक सदस्यीय समितीच्या अहवालात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. रोहित हा त्याच्या घरगुती समस्यांमुळे चिंतेत होता. त्यामुळे तो नाखूश असायचा. त्याच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीवरूनही ही बाब स्पष्ट होते. मी लहानपणापासून एकटाच पडलो आणि मला कुणी आपलं मानलंच नाही, अशी खंतही त्याने चिठ्ठीत व्यक्त केली होती. तसेच त्याने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरले नव्हते. विद्यापीठाच्या निर्णयावर तो नाराज असता तर त्याने नक्कीच विरोध दर्शवला असता, असेही अहवालात सांगण्यात आले आहे.