सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:12 IST)

साई चरणी आतापर्यंतचे विक्रमी दान

sai baba

रामनवमी उत्सव काळातील तीन दिवसांत शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साईभक्तांनी सुमारे साडे सहा कोटींचं दान अर्पण केलं. उत्सवाच्या काळात साईचरणी मिळालेलं आतापर्यंतचं विक्रमी दान आहे. यात  देणगी काऊंटरवर 48 लाख रुपये तर दान पेटीत 1 कोटी 54 लाख रुपयांचे दान मिळालं असून, नोटाबंदीनंतर साईंना ऑनलाईन दान करण्याच प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन, चेक, डीडी आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही रेकॉर्ड ब्रेक 53 लाख रुपयांच दान साईंना आलं आहे.हैद्राबाद येथील भास्कर पार्थ रेड्डी यांनी 12 किलो सोन दान केलं.