शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपातून स्कुलबसला वगळले

देशात मालवाहतूकदार  संपावर गेले आहेत.  विमा असून यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये 50 टक्यांची वाढ झाल्याच्या निषेधार्थ हा संप होतोय. एक एप्रिलपासून ही वाढ लागू झाली आहे. या संपामुळे  देशातील मालवाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून अनेक ठिकाणी जीवन आवश्यक असलेला किराणा माल उशिरा पोहोचणार आहे. याशिवाय वाहनांच्या परिवहन शुल्कात वाढ झाली, ती वाढ कमी करण्याचं आश्वासन देऊनही फार काही झालं नाही त्यामुळे ही सुद्धा मागणी या संपात केली गेली आहे. मात्र या संपातून शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने स्कुलबसेस यातून वगळण्यात आले आहे.