रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2024 (12:33 IST)

मोठ्या बहिणीने अभ्यास केला नाही म्हणून खडसावले,12 वर्षाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

suicide
उत्तर प्रदेश आग्रा जिल्हयात ताजगंज क्षेत्राच्या आनंदी विहार परिसरात अभ्यास केला नाही म्हणून रागावले तर लहान मुलाने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश आग्रा जिल्हयात ताजगंज क्षेत्राच्या आनंदी विहार परिसरात अभ्यास केला नाही म्हणून रागावले तर लहान मुलाने फाशी घेत आत्महत्या केली आहे. हा मुलगा 12 वर्षाचा असून चौथीच्या वर्गात शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा घरात खेळत होता. तेव्हा त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला अभ्यास केला नाही म्हणून रागावले.त्यानंतर दोघी बहीणभावामध्ये भांडण झाले. 
 
ज्यामुळे 12 वर्षाचा हा लहान मुलगा रूम मध्ये गेला व दरवाजा बंद केला. त्यावेळी या मुलांची आई घरी न्हवती. मुलांची आई घरी आली व तिने या मुलाला आवाज दिला. पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. या महिलेने जेव्हा खिडकीमधून पहिले तेव्हा तिला हा मुलगा फाशीला लटकलेला दिसला. या मुलाला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले पण चिकिस्तकांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला.