भाजपचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या पत्नीची धारदार शस्त्रांनी हत्या
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दुहेरी हत्या झाल्याची घटना घडली आहे. भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. चोरट्यांनी घरात घुसून हा गुन्हा केला. पोलिसांनी शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.
देवास रोडवरील पिपलोडा गावात राहणारे माजी सरपंच आणि भाजप नेते रामनिवास कुमावत आणि त्यांची पत्नी मुन्नीबाई यांची हत्या करण्यात आली आहे. उज्जैनचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. प्राथमिक तपासानंतर दोन्ही हत्या दरोड्याच्या कारणावरून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भाजप नेते रामनिवास कुमावत आणि त्यांची पत्नी मुन्नीबाई यांचे मृतदेह घरातील एका खोलीत सापडले आहेत. मृतदेह रक्ताने माखलेले असून मृतदेहांवर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. घरातील साहित्यही विखुरलेले आढळले. प्राथमिक तपासात घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तुटलेले आढळून आले.
एसपी सचिनने सांगितले की, रामनिवा आपल्या पत्नीसोबत गावातील त्याच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. त्यांचा मुलगा देवास शहरात राहतो तर मुलीचे लग्न झाले आहे. ते दररोज सकाळी फिरायला जायचे. आज ते न दिसल्याने गावात राहणाऱ्या मेव्हण्याने त्यांचे घर गाठले असता प्रवेश दार उघडे दिसले.
रामनिवास यांच्या मेव्हण्याने आत जाऊन पाहिले असता त्यांची बहीण व मेहवण्याचे मृतदेह पडलेले होते. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले असता तपासात दरोडा, लुट आणि खुनाचा संशय बळावला. ही घटना पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडली.
रामनिवास यांच्या मेव्हण्याने सांगितले की, त्यांचे म्हेवणे व्यापारी असून त्यांच्याकडे सुमारे 300 बिघे जमीन होती. ते गावातील सर्वात श्रीमंत व्यापारी होते . ते भाजपचे माजी मंडल अध्यक्ष राहिले असून आजही जोडलेले होते.
Edited by - Priya Dixit