पैसे भरताय तर वाचा आता शनिवार केवळ खातेधारक आणि जेष्ठ नागरिकांचा
आठवडाभरापासून सर्वच बँकांमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा भरणे किवा नोटा बदलून घेण्यासाठी खातेदारांची प्रचंड गर्दी होत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी आता शनिवारी बँकांमधून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळणार आहे. सोबतचा अजून गर्दी कमी व्हावी या करिता तखातेदारांनांच आपल्या बॅंकेत व्यवहार करता येणार आहे. या बाबतची माहिती माहिती इंडियन बँकिंग असोसिएशनचे चेअरमन राजीव ऋषी यांनी पत्रकारांना दिली आहे . तर आज केवळ पैसा भरणा होणार असून आज पैसे मिळणार नाही असेही घोषणा झाली आहे.