बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2016 (17:02 IST)

शाहरुख खानला मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान

shahrukh khan
अभिनेता शाहरुख खानला मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून  डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.  हैदराबादच्या गाचीबोवली परिसरातील कॅम्पसमध्ये मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचा 6वा दीक्षान्त समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी शाहरुख खान म्हणाला, मला हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे मी फार खूश आहे.शाहरुख खान सोबत राजीव सराफ यांना डॉक्टरेटनं सन्मानित करण्यात आलं आहे. राजीव यांना ही पदवी ऊर्दू भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी  प्रधान करण्यात आली आहे.