Last Updated:
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (15:22 IST)
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिलं आहे. मात्र शिवसेनेने मात्र बिस्कीट या चिन्हावर नापसंती दर्शवली आहे. याआधी
नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरआक्षेप घेतला होता. बाण हे जेडीयू पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण निशाण मिळणार नाही.
दरम्यान निवडणूक आयोगाला शिवसेनेने तीन पर्याय दिले होते. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली होती. पण यापैकी कोणतंच चिन्ह न मिळाल्याने शिवसेनेने निवडणूक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिलंय.