मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बिहार विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated : बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (15:19 IST)

शिवसेनेला बिहारमध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही

बिहार विधानसभेची निवडणुकीत निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे.
 
याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. जेडीयूला होणारं मतदान नकळत शिवसेनेला जाऊ शकतं. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक आणि प्रसिद्ध पक्ष नाहीत. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली होती. नितीशकुमार यांच्या आक्षेपानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही असं सूचित केले आहे.