1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (10:24 IST)

मुंढेना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

Bring Mundhena
नुकतीच तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरुन बदली झाली आहे. मात्र नागपुरातील कोरोनाची स्थिती पाहता, त्यांची बदली रद्द करुन, पुन्हा नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्त करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. 
 
“नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अथक प्रयत्न करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा”, असं किशोर कुमेरिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.