शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (08:54 IST)

एसटीकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष बस फेऱ्या सुरू होणार

एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात येत्या सोमवारपासून शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष बस फेऱ्या सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
 
सुरुवातीला डोंबिवली, पनवेल, विरार येथून मंत्रालयाकरीता प्रत्येकी एक बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार असून महिला प्रवाशांचा प्रतिसाद बघून फेर्‍या वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
 
महिला कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय पाहाता महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याबाबत विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती.