शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (08:43 IST)

हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची लागण, ट्विटरवरून दिली माहिती

hasan mushrif
नितीन राऊत यांच्यापाठोपाठ महाविकासआघाडीतील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द हसन मुश्रीफ यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कोरोना झाला असला तरी आपली तब्येत उत्तम असल्याचंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.', असं ट्विट हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.  हसन मुश्रीफ यांच्याआधी उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही सकाळीच आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं.