1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (16:33 IST)

तीन मंत्र्याची कार्यालय बंद, कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह

corona virus
मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयातील तीन मंत्र्याची कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. या तीन मंत्री कार्यालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही मंत्री कार्यालये तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. यात अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. 
 
नितीन राऊत यांच्या कार्यालयात काम करणारे ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.
 
राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांचे मंत्रालयातील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.