सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (08:24 IST)

बाप्परे, भाजपच्या 'या' खासदारांना पुन्हा कोरोनाची लागण

नांदेड भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती चिखलीकरांनी दिली आहे.
 
गेल्या महिन्यात ७ ऑगस्ट रोजी प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापूर्वी त्यांच्या मुलाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. तर महिन्याभरात प्रताप पाटील चिखलीकरांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. ते सध्या दिल्लीतील निवासस्थानी वास्तव्यास असून ‘माझी प्रकृती उत्तम’ असल्याचे माहिती चिखलीकरांनी दिली आहे. दरम्यान मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली होती.