गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (22:18 IST)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरीही कोरोना पॉझिटिव्ह

unionunion minister
देशात कोरोना विषाणू फारच तीव्र गतीने पसरत आहे. आता मोदी सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. गडकरी यांनी ट्विटद्वारे आपल्या कोरोना पॉझिटिव्हबद्दल माहिती दिली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 30 खासदारांना कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. 
 
नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, 'काल मला खूप अशक्तपणा जाणवत होता, त्यानंतर मी माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझा कोविड -19 चा अहवाल चेकअप दरम्यान सकारात्मक आला. सध्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा यामुळे मला बरे वाटत आहे. मी स्वत: ला आइसोलेट केले आहे. '