बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (15:53 IST)

सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सच्या बॅट तयार करणारे चाचा यांना कोरोनाची लागण

सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सच्या बॅट तयार करणारे आणि दुरुस्त करणाऱ्या अश्रफ चौधरी (अश्रफ चाचा) यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्यांच्या मदतीला धाऊन आला आहे. त्याच्या उपचारावरील खर्चही सचिन तेंडुलकरच करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून  अश्रफ चाचा हे मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल झाले होते. ते किडनीच्या समस्येनेही त्रस्त आहेत.
 
आधिपासून अश्रफ चाचा हे एका रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, या वेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. हे समजल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरून अश्रफ यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केलं आहे.  प्रशांत जेठमलानी अश्रफ यांचे हितचिंतक त्यांच्या उपचारासाठी  पैशांची जुळवा-जुळव करत होते. याच वेळी सचिन तेंडुलकर अश्रफ यांच्या मदतिला धावून आला आहे. त्यामुळे  पडद्यामागील या क्रिकेट सेवकाला धन्यता वाटली  आहे.