1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (16:13 IST)

अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल

Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रात्री २ वाजता राजधानी दिल्लीस्थित असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी अमित शाह हे नुकतेच कोरोनातून बरे होऊन घरी परतले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अमित शाह यांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली शाह यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
अमित शाह यांना रात्री २ वाजता थोडा ताप जाणवू लागल्यामुळे त्यांना तात्काळ एम्सच्या खासगी कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.