सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (15:26 IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे. आर्मी रुग्णालयाने ही माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. 
 
१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.