सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (09:24 IST)

पुरुषोत्तम महिना 2020 : काय खावे, काय खाऊ नये

पुरुषोत्तम किंवा अधिक महिन्यात कोणत्या गोष्टींचा त्याग करावा, जाणून घ्या
 
अधिक महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे. या महिन्यात प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि श्री हरीची उपासना करणे अधिक महत्वाचे आहे. हा महिना भगवान शिवाच्या पूजनासाठी देखील महत्वाचा आहे. शास्त्रात या महिन्यात तामसी पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई केली आहे. 
 
या महिन्यात जप, तपश्चर्या, देणगी देण्याचे विशेष महत्व आहे. एवढेच नव्हे तर या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे महत्व आहे. चला जाणून घ्या की अधिक महिन्यात कोण कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा आणि काय घेणं टाळावं.
 
 
अधिक महिन्यात काय खावं -
या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, जवं, मटार, तीळ, काकडी, केळी, आंबा, तूप सुंठ, चिंच, सेंधव मीठ, आवळा. या गोष्टींचे सेवन करून जेवण केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात शारीरिक कष्ट कमी होतं. या वस्तू किंवा यापासून बनविलेले पदार्थ सेवन केल्याने जीवनात सात्विकता वाढते. म्हणून या महिन्यात वरील पदार्थांचे सेवन आवर्जून केले पाहिजे.
 
अधिक महिन्यात काय खाऊ नये - 
या महिन्यात उडीद डाळ, मसुराची डाळ, वांगी, लसूण, कांदा, मोहरी, मुळा, गाजर, फ्लॉवर किंवा फुल कोबी, कोबी, मध, मांस, मद्यपान, धूम्रपान, मादक पेय. या गोष्टींचे सेवन केल्याने तामसी गुण वाढतात ज्याचा परिणाम आपल्यावर आयुष्यभर पडतो. म्हणून अधिक महिन्यात या गोष्टींना वर्ज्य मानले गेले आहे. 
 
जी व्यक्ती अधिक महिन्यात पूजा उपासना- ध्यान यात आपले मन लावून नियमाने या खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा स्वीकार करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते आणि शरीर निरोगी राहतं.