शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (15:55 IST)

Adhik Maas नियम पाळा, कल्याण होईल

अधिकमास या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णू, पुरुषोत्तम आहे म्हणून या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या कारणामुळेच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चना करतात, तीर्थ स्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.
 
* महिनाभर सतत नामस्मरण करावे - यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.
 
* नारायण - श्रीकृष्णाचे स्मरण करावे.
 
* पोथीवाचन - अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्त्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. 
 
पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्री नारायण प्रसन्न होऊन भक्तांचे कल्याण करतात.
 
* या महिन्यात रोज गायीला पुरण पोळीचा घास द्यावा.
 
* अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पूत्र पौत्रांचा लाभ होतो,
 
* अधिकमासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. उपोषणाचे प्रकार एकभुक्त अर्थात दिवसातून एकवेळ जेवावे व एकवेळ उपवास करावा. किंवा अयाचित अर्थात अकस्मात दुसर्‍याकडे जेवायला जावे किंवा उपोषण अर्थात पूर्ण उपवास करावे.
 
* महिना भर शक्य नसल्यास उपोषणाचा या तिन्ही पैकी एक तरी प्रकार तीन दिवस तरी करावा. न जमल्यास निदान एक दिवस तरी करावा.
 
* महिनाभर तांबूल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते.
 
* महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
 
* महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगा स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
 
* महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते.
 
* अधिकमासात नित्य कर्मे करावीत त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करून नयेत. जे केल्यावाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत.