18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत अधिक मास, पूर्ण महिन्यात 25 दिवस शुभ
यंदा 18 सप्टेंबर 2020 पासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक मास बद्दल शास्त्रात सांगितले आहे की अधिकस्य अधिक फलम अर्थात अधिक मासात शुभ कार्यांचे फल देखील अधिक मिळतं. मांगलिक जसे विवाह, गृह प्रवेश इतर कार्य सोडले तर अधिक मासात कोणत्याच कार्यांसाठी मनाही नाही. पूर्ण महिन्यात 25 दिन शुभ असून खरेदी करता येऊ शकते. यापैकी 15 दिवस तर अत्यंत महत्त्वाचे आहे. या दरम्यान धार्मिक अनुष्ठानाचे पूर्ण फल मिळेल.
अधिक मासाचे शुभ दिन, पुष्य नक्षत्र, अमृतसिद्धी योग
सर्वाथसिद्धी योग: हे प्रत्येक कार्यात यश देणारा योग. 26 सप्टेंबर आणि 1,4,6,7,9,11,17 ऑक्टोबर 2020 रोजी हा योग आहे.
द्विपुष्कर योग: कामाचे दुपटीने फल देणारा योग. 19 आणि 27 सप्टेंबर रोजी द्विपुष्कर योग.
अमृतसिद्धी योग: या दरम्यान केलेल्या कार्यांचे फल दीर्घकालीन असतं. 2 ऑक्टोबर रोजी योग.
पुष्य नक्षत्र: अधिक मासात दोन दिवस पुष्य नक्षत्र योग बनत आहे. 10 ऑक्टोबरला रवी पुष्य तर 11 ऑक्टोबरला सोम पुष्य नक्षत्र असेल. या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करता येऊ शकतं.
या महिन्यात हिंदू धर्मातील विशिष्ट वैयक्तिक संस्कार जसे बारसं, यज्ञोपवती, लग्न आणि गृह प्रवेश असे मांगलिक कार्य करणे वर्जित मानले गेले आहे.