1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Shocking The brother killed his cousin

धक्कादायक !भावानेच दिला चुलत भावाचा बळी

नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे घडली आहे.एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आपल्या आजारी मुलाला बरे करण्यासाठी आपल्या 10 वर्षाच्या चुलत भावाची बळी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी अनूप आणि एका तांत्रिकासह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी सांगितले की, ही घटना बहराईच जिल्ह्यातील नानपारा कोतवाली भागातील परसा गावातील आहे.
 
कृष्णा वर्मा यांचा मुलगा विवेक (10) हा चौथीचा विद्यार्थी गुरुवारी रात्री घरातून बेपत्ता झाला आणि रात्री उशिरा त्याचा मृतदेह त्याच्याच शेतात सापडला. मुलाचा गळावर धारदार शस्त्राने वार करून  मृतदेह मातीखाली पुरून लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
तपासादरम्यान असे आढळून आले की, मृत विवेकचा चुलत भाऊ अनूप याचा अडीच वर्षांचा मुलगा मानसिक आजारी होता आणि डॉक्टरांना उपचारात यश न आल्याने तो जगन्नाथपूरला गेला. तेथे एका मांत्रिकाच्या जाळ्यात तो अडकला. 
 
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,मांत्रिकाने अनूपला त्याच्याच मुलाच्या वयाच्या मुलाची बळी देण्यास प्रवृत्त केले जेणेकरून त्याचे मूल बरे होईल. त्याने सांगितले की, या बहाण्याने अनूपने वडील चिंताराम याच्या साहाय्याने गुरुवारी/शुक्रवारी मध्यरात्री विवेक (10) याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.
 
खून केल्यानंतर अनुप आणि त्याच्या वडिलांनी विवेकचा मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने शेतात पुरल्याचे त्याने सांगितले.विवेकच्या वडिलांच्या तक्रारीवरून 
शनिवारी पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून जवळच्या शेतात लपवून ठेवलेले धारदार शस्त्र जप्त केले. 
 
 
Edited By- Priya Dixit 
 
पुढील लेख
BCCI Central Contracts: भुवनेश्वरची करारातून हकालपट्टी