suvichar
✕

ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू

Updated: गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 (09:15 IST)
 
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक मोठी बातमी येत आहे, जिथे एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला. एका स्लीपर बसला आग लागली. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा बसमध्ये ३५ जण होते, त्यापैकी अनेक जण आगीत गंभीररित्या भाजले आहे. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. ही डबल-डेकर बस नोएडाहून आग्राकडे जात होती.
ALSO READ: वर्धा-सेलू येथे शेतातील विहिरीत पडून दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
यमुना एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या एका पर्यटक बसला अचानक आग लागली. नोएडापासून सुमारे ३४ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेवर कार्गो विमानतळाजवळ ही आग लागली. जळणाऱ्या बसचा एक भयानक व्हिडिओ देखील समोर आला आहे. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ऐनवेळी बसमधून उडी मारली. काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली.
ALSO READ: मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात! वाद मिटवण्यासाठी गेलेल्या वडिलांची लोखंडी सळीने वार करून हत्या
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments