शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:19 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी अस्वस्थ - स्मृती इराणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी अस्वस्थ असून आणि केवळ आपला राजकीय वारसा वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. सुट्टीहून परतल्यानंतर आणि आत्मचिंतनानंतर राहुल गांधी यांचे लक्ष थोडेसे विचलित झाले आहे. कारण पंतप्रधानांची लोकप्रियता वाढत आहे.  पंतप्रधान मोदींवर अपमानकारक टीका करुन आपला राजकीय वारसा जपण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रयत्न करणं स्वाभाविक आहे, असा टोलाही स्मृती इराणी यांनी लगावला आहे.