शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सोबत मृत्यू यावा म्हणून तो पत्नीला चावला

बिहारच्या समस्तीपूरमध्ये वेगळीच घटना घडली आहे. गावात विषारी सापाने एका पतीला चावा घेतला व मग हा पती त्याच्या पत्नीच्या मनगटाला चावला. त्याची शेवटची इच्छा होती की त्याला त्याच्या पत्नीसोबत मृत्यू यावा. तत्काळ उपचारांनी डॉक्टरांनी पत्नीला वाचवले पण पतीला मृत्यू आला. 
बिरसिंघपूर गावात शंकर राय झोपेत असताना साप त्याला चावला. प्रकृती बिघडली. त्याचे डोळे उघडले तेव्हा तो स्वत:ची अवस्था पाहून घाबरला व त्याने पत्नीच्या मनगटाला चावा घेतला. त्याचे त्याच्या पत्नीवर खूपच प्रेम होते व त्याला तिच्यासोबत मरायचे होते. मग त्याने विचार केला की आपण तिला चावल्यास विष तिच्या शरीरात जाईल व तिला मृत्यू येईल. काही वेळाने दोघेही बेशुद्ध पडले. त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. तेथे शंकरचा मृत्यू झाला. त्याची पत्नी अमिरी देवी हिने सांगितले की मला पती जबरदस्तीने चावला नाही तर मी माझा हात त्याला दिला म्हणजे दोघांची एकाचवेळी मरण्याची इच्छा पूर्ण होईल.