1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सापाच्या जोडीमुळे शाळेची सुटी (Video)

प्रणय लीला करत सापाचं जोडपं बारां जिल्ह्यातील शाहाबाद वस्तीत स्थित स्वामी विवेकानंद राजकीय मॉडल स्कूलमध्ये शिरलं. ज्यानंतर शाळेत खुप गडबड गोंगाट झाला. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना वार्गातून बाहेर काढून शाळेतील प्रागंणात बसवले. साप पकडण्याचा प्रयत्न करत किती तरीतासाने नागिण पकडण्यात आली पण नाग काही शाळेतून बाहेर पडला नाही. कोणत्याही प्रकाराचा अपघात टाळण्यासाठी मुलांना सुटी देऊन शाळेला ताळा लावण्यात आला.
 
किंग कोबराचं हे जोडपं रविवारी शाळेत शिरलं होतं परंतू तेव्हा चौकीदार कोणालाही ही वार्ता न कळवत गच्चीवर जाऊन झोपून गेला. दुसर्‍या दिवशी शाळा सुरू झाल्यावर त्याने साप शाळेत असल्याबद्दल माहिती दिली तर तडकाफडकी विद्यार्थ्यांना वर्गांतून बाहेर काढून वरांड्यात बसवले गेले. वन विभागाला सूचित करून साप पकडण्याची कवायद सुरू केली गेली.
 
वन विभागाच्या ‍टीमला काही तासांनंतर वाटर कूलरमागे नागिन लपलेली सापडली. खूप प्रयत्न करून तिला वरांड्याच्या बाहेर काढण्यात आले. वरांड्यात शंभराहून अधिक लोकं दिसत असूनही नागिण फन काढून फुंकारत होती आणि पुन्हा शाळेच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होती. नंतर खूप प्रयत्न करून टीमने तिला जंगलात नेऊन सोडले. तसेच लाख प्रयत्न करूनदेखील नाग धरण्यात टीमला काही यश मिळाले नाही.