शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:27 IST)

बाबा रामदेव यांच्यावरील पुस्तक विक्रीवर स्थगिती

योगगुरु बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित 'गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव' या पुस्तकाच्या विक्रीवर स्थगिती आणण्यात आली आहे. दिल्लीमधील न्यायालयाकडून ही स्थगिती आणण्यात आली आहे. जगरनॉट बुक्सने न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने प्रकाशक किंवा लेखकाची बाजू ऐकून न घेताच बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीवर स्थगिती आणली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

10 ऑगस्ट रोजी आपल्याला हा निर्णय कळवण्यात आला असून, लवकरच निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती प्रकाशकाने दिली आहे. प्रियांका पाठक नारायण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी  दिली आहे. 'बाबा रामदेव यांच्यावर आधारित याआधी कोणतंच पुस्तक लिहण्यात आलं नसल्याने आम्हाला अशा प्रकारच्या स्थगितीची काहीच कल्पना नव्हती', असं प्रियांका यांनी सांगितलं आहे.