गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024 (09:08 IST)

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. एका पोलीस अधिकारींनी ही माहिती दिली असून नानाखेडा पोलिस स्टेशनचे प्रभारी नरेंद्र कुमार यादव यांनी सांगितले की, प्रांशुल व्यास वय 20 हा उज्जैनपासून 50 किमी अंतरावर असलेल्या इंदूर येथील शासकीय महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता आणि तो भाड्याच्या घरात राहत होता. व त्याच्या सोबत दोन मित्र राहत होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार राहत्या घरी प्रांशुलने गळफास लावून घेतला तेव्हा तो एकटाच होता. यादव यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने ज्या खोलीत हे पाऊल उचलले त्या खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. तसेच प्रांशुलने त्याच्या गळ्यात फास कसा बांधायचा याचा मोबाईल फोनवर शोध घेतला होता. यादव म्हणाले की, पोलीस प्रांशुलच्या मित्रांची चौकशी करतील आणि त्याने आत्महत्या का केली हे शोधण्यासाठी त्याचे सोशल मीडिया खाते आणि मोबाईल फोन तपासले जाणार आहे.