गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (12:33 IST)

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

sukma
छत्तीसगढ मधील धूर नक्षल केंद्र सुकमा मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सकाळी पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई झाली. दोन्ही कडून जोरदार गोळीबार झाला. जवानांनी यश मिळवून एक नक्षलीला ठार केले. लढाई नंतर जवान या परिसरात शोध अभियान राबवत आहे. एसीपी किरण चव्हाण यांनी या प्रकरणाची पुष्टी केली आहे. हे प्रकरण पोलमपल्ली क्षेत्रातील आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही लढाई टेटराई तोलनाईच्या जंगलात झाली. जवानांना या जंगलात नक्षली असल्याची माहिती मिळाली. मग या दरम्यान घात लावून बसलेल्या नक्षलींनी जवानांवर फायरिंग करण्यास सुरवात केली. जवानांनी त्यांना फायरिंगने सडेतोड उत्तर दिले. व एका नक्षलीला ठार केले. तसेच नक्षलीचा मृतदेह आणि काही सामान जवानांना मिळाला. 
 
छत्तीसगढ मध्ये नक्षलवादी विरोघात जवानांचे अभियान युद्ध स्तरावर सुरु आहे. शुक्रवारी सुरक्षाबलाने गरियाबंदच्या कोदोमाली, इचराडी, गरीबा आणि सहबिनकछार गावातील जंगलांमध्ये नक्षलवादींच्या ठिकाणांना नष्ट केले. तसेच गरियाबंद आणि ओडिशा सीमा जवळ शोभा पोलीस स्टेशन जवळील जंगलातून जवानांनी तीन आईइडी जप्त केले.