गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भोपाळ , बुधवार, 28 डिसेंबर 2016 (12:05 IST)

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे निधन

sundarlal patwa
वरिष्ठ भाजपा नेता आणि मध्यप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे बुधवारी एका दवाखान्यात हृदयघातामुळे निधन झाले आहे. ते 92 वर्षाचे होते.  
 
हृदयघाताची माहिती मिळताच पटवा यांना सकाळी त्यांच्या स्वगृहातून तत्काल येथे एका निजी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले, जेथे चिकित्सकांनी त्यांना मृत घोषित केले. पटवा यांच्या कुटुंबात बायको फूलकुंवर पटवा आणि पुतणे सुरेंद्र पटवा आहे. सुरेंद्र पटवा राज्याचे  संस्कृती आणि पर्यटन मंत्री आहे.   
 
पटवा यांच्या निधनानंतर मध्यप्रदेशात शोक पसरला आहे. या दरम्यान आधिकारिक सूत्रांनी सांगितले की मुख्यमंत्री यांना पटवा यांच्या निधनानंतर मध्यप्रदेशात तीन दिवसीय राजकीय शोक असण्याची घोषणा केली आहे. त्यांचा पार्थिव देह आज दुपारी प्रदेश भाजप कार्यालयात लोकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येईल. त्यांचा अंतिम संस्कार गुरुवारी निमच जिल्ह्यात स्थित त्यांचे गृहनगर कुकडेश्वरमध्ये पूर्ण राजकीय सन्मानात करण्यात येईल.