बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (15:26 IST)

नवीन नोटा इतक्या मोठ्या प्रमाणात सापडतात कश्या - सुप्रीम कोर्ट

देशात नोट बंदी झाली अनेक तारखा उलटल्या, तरीही अनके लोकांकडे लाखो रुपयांच्या नवीन नोटांचे बंडल कसे काय सापडता’ असा.समान्य माणूस रांगेत उभा मग हे नवे आणि इतके पैसे येतात कोठून अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. 
 
नोटाबंदीप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी  झाली आहे . त्यावेळी कोर्टानं याबाबत सरकारला उत्तर विचारले आहे. देशात लोकांना अजूनही प्रत्येक आठवड्याला २४ हजार रुपये काढता येत नाही. मग काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नोटा कशा आढळतात?’ असा सवालच सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. यावर काही बँकांमधील मॅनेजर बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असून संबंधितांवर कारवाई करत असल्याचं अॅटर्नी जनरल यांनी सुनावणीवेळी स्पष्ट केलं आहे.