बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2017 (17:25 IST)

सर्वोच्च न्यायालयात सहा दिवस चालणार ट्रिपल तलाकवर सुनावणी

मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाक पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. संविधान खंडपीठ दररोज ट्रिपल तलाकवर सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जगदिश सिंह खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ ही सुनावणी करणार आहेत. सुप्रीम कोर्टात सहा दिवस ही सुनावणी चालणार आहे. दोन-दोन दिवस विरोधी आणि समर्थकांनी युक्तीवाद करावा, त्यानंतर 1-1 दिवस एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी, असं कोर्टाने म्हटलं आहे. या खंडपीठात शिख, ख्रिश्चन, पारशी, हिंदू आणि मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या न्यायाधिशांचा समावेश आहे. ट्रिपल तलाकविरोधात सर्वोच्च न्यायालयात सात याचिका दाखल झाल्या आहेत. यापैकी 5 याचिका या मुस्लिम महिलांनी दाखल केल्या आहेत.