शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (13:10 IST)

तिहेरी तलाकला पद्धती स्वीकारता येण्यासारखी नाही : SC

इस्लाममध्ये विविध विचारधारेत तिहेरी तलाकला ‘वैध’ म्हटले असले तरी लग्न मोडण्यासाठी अवलंबलेली ही सर्वात वाईट पद्धत आहे. त्यामुळे ही प्रथा स्वीकारता येण्यासारखी नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. मुस्लिमांमधील तिहेरी तलाकच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील ऐतिहासिक सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि वरीष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांनी या मुद्द्याची न्यायिक समीक्षा होण्याची गरज आहे, असे मत न्यायालयात मांडले. त्यावर न्यायालयानं ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सलमान खुर्शीद हे या प्रकरणात न्यायालयासाठी न्यायमित्राची भूमिका निभावत आहेत.