1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (17:17 IST)

प्रभू तुमची रेल्वेला गरज - पंतप्रधान

suresh prabhu

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपवला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर टीका होत होती.  उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. एक्स्प्रेसने डंपरला धडक दिली यानंतर एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले. या अपघातात ७० प्रवासी जखमी झाले होते. त्यामुळे व्यथित झालेले प्रभू यांनी लगेच आपला राजीनामा पंतप्रधान मोदी यांना दिला होता. मात्र मोदी आणि इतर सर्वाना प्रभू यांचे काम माहित आहे, जेव्हा राजीनामा दिला गेला तेव्हा तत्काळ मोदिनी राजीनामा फेटाळला आहे, तर उलट प्रभू यांना सागितले की असे करू नका भारतीय रेल्वेला तुमची गरज आहे त्यामुळे तुमचा राजीनामा मी आणि सरकार सिकारणार नाही. कठीण काळातून आपण सर्व नक्कीच बाहेर येवू असे मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रभू यांचा राजीमाना स्वीकारला गेला नाही.