शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 16 डिसेंबर 2024 (10:48 IST)

तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन

Tabla maestro Ustad Zakir Hussain passes away at the age of 73
Zakir Hussain Death : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   
पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते हुसैन यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी रविवारी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली होती. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. अमेरिकेत राहणाऱ्या संगीतकाराला रक्तदाबाचा त्रास होता. 'हृदयाच्या समस्येमुळे हुसेनला गेल्या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.' पण, रात्रीपर्यंत त्यांच्या निधनाचे वृत्त खोटे ठरवले जात होते. तबलावादक म्हणून ते जगभर प्रसिद्ध असून देश-विदेशातील अनेक मोठे सन्मान त्यांना मिळाले आहे. अखेरीस तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन वयाच्या 73 व्या वर्षी अनंतात विलीन झाले.