शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 15 जानेवारी 2018 (09:20 IST)

‘तीन मूर्ती हैफा’चौक झाले तीन मूर्ती चौकाचे नाव

मध्य दिल्लीतील सुप्रसिद्ध तीन मूर्ती चौकाचे अधिकृत नामांतर करण्यात आले. “तीन मूर्ती हैफा’चौक असे नाव आता या चौकाला देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात हे नामांतर करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी या चौकात शिलालेखाची उभारणी केली आणि संदेश पुस्तिकेमध्ये आपल्या भावना व्यक्‍त केल्या.
 
‘पहिल्या महायुद्धाच्या काळात इस्रायलमधील हैफा शहराच्या रक्षणासाठी भारतीय सैनिकांनी केलेल्या निस्वार्थ त्यागाचे आणि बलिदान दिले. भारतीयांच्या परंपरेला आपले वंदन आहे.’ असे पंतप्रधानांनी संदेश पुस्तिकेमध्ये लिहीले आहे. निस्वार्थी वृत्ती आणि बलिदानाच्या अध्यायाची काही पाने 100 वर्षांपूर्वी हैफामध्ये लिहीली गेली आहेत. त्याच्या शताब्दीनिमित्त तीन मूर्ती चौकाचे नामांतर केले जात आहे. या चौकाला “तीन मूर्ती हैफा’ असे नाव देण्याचा हा क्षण ऐतिहासिक आहे. या निमित्ताने हैफामध्ये शहिद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहिली जात आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे आज 6 दिवसांसाठी भारतात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून विमानतळावर नेतान्याहू यांचे स्वतः स्वागत केले. तीन मूर्ती चौकात उभारलेल्या ब्रॉंझच्या तीन मूर्ती या हैदराबाद, जोधपूर आणि म्हैसूरच्या लष्करी तुकड्यांचे प्रतिनिधीत्व करतात. स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी 15 इम्पेरियल सर्व्हिस कॅव्हलरी ब्रिगेड या सैन्य दलात या तीन सशस्त्र तुकड्या होत्या. या तुकड्यांनी महिल्या महायुद्धाच्या काळात 23 सप्टेंबर 1918 रोजी मजबूत हैफा शहरावर विजय मिळवला होता. ऑटोमन्स, जर्मनी आणि ऑस्ट्रीया, हंगेचीच्या संयुक्‍त फौजा या शहराच्या संरक्षणासाठी असताना या तीन तुकड्यांनी विजय मिळवलेल्या या लढाईचे अनेक पैलू प्रसिद्ध आहेत. हे शहर स्वतंत्र झाल्यामुळे मित्र राष्ट्रांच्या सेनेला सागरी मार्गाने रसद पोहोचवणे शक्‍य झाले होते. हैफा शहर स्वतंत्र करण्यासाठीच्या या युद्धामध्ये 44 भारतीय सैनिकांना हैतात्म्य प्राप्त झाले होते. आतापर्यंत 61 कॅव्हलरी (घोडदळ)च्यावतीने 19 सप्टेंबर हा स्थापना दिवस “फहैफा दिन’ म्हणून साजरा केला जातो.