सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2017 (14:42 IST)

आता राजद कोर्टात जाणार

राजद नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेसाठी राजद हा सर्वात मोठा पक्ष असूनही नितीश कुमारांना सत्ता स्थापनेसाठी राजदच्या आधी बोलावल्याबद्दल कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बिहार विधानसभेत राजद हा 80 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यपालांनी नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर दोन दिवसात विधानसभेत आपले बहुमत सिध्द करण्यास काल रात्री सांगितलं. नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव बुधवारी रात्री उशीरा राज्यपालांची भेट घेतली. नितीश कुमारांविरूद्ध राज्यव्यापी निषेध मोर्चे काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलय.'बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी आम्ही आमचं संख्याबळ दाखवू' असंही तेजस्वी यादव यांनी सांगितल आहे.