1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:51 IST)

भीषण अपघात :अनियंत्रित बसने अनेकांना चिरडले

Terrible accident: Uncontrolled bus crushed many भीषण अपघात :अनियंत्रित बसने अनेकांना चिरडलेMarathi National News  In Webdunia Marathi
कानपूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात झाला. शहरातील व्यस्त चौक असलेल्या टाटमिल येथे एका अनियंत्रित इलेक्ट्रॉनिक बसने ट्रॅफिक बूथ आणि कंटेनरवर धडक देत अनेकांना चिरडले. या अपघातात 5 जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
 
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  बसने समोरून येणाऱ्या एका ट्रकलाही धडक दिली. अपघात झाला तेव्हा चौकाचौकात गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी त्याच्या विळख्यात सापडले आहेत.
 
यापैकी पाच जणांचा मृत्यूही झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. सध्या घटनास्थळी पोहोचलेले पोलीस बचावकार्यात गुंतले आहेत. अपघातात जखमीं झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरधाव वेगाने जाणारी बस टाटमिल चौकात येताच अनियंत्रित झाली. यानंतर बस विजेच्या खांबाला धडकली आणि समोर उभ्या असलेल्या वाहनांवर आदळली. धडकल्यानंतरही बस थांबली नाही आणि समोरून रस्त्यावरून येणा-या अनेकांना तुडवत गेली.