सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (13:45 IST)

दिल्ली सरकारची घोषणा, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्यां खेळाडूंना तीन कोटी रुपये मिळणार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या क्रीडापटूंना 3 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी जाहीर केले.दिल्ली सरकार ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना दोन कोटी रुपये आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 1 कोटी रुपये रोख पारितोषिक दिले जातील. 
 
सिसोदिया म्हणाले की पदक विजेत्यांच्या प्रशिक्षकांना दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जातील.ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार्‍या दिल्लीच्या खेळाडूंमध्ये दीपक कुमार,मनिका बत्रा,अमोज जेकब आणि सार्थक भांबरी यांचा समावेश आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल. यावेळी ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय खेळले जाणार आहे.