गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 18 मार्च 2023 (12:21 IST)

स्वतःचाच गळा चिरून तरुण रस्त्यावर दिल्लीची घटना

दिल्लीतील शहादाच्या नथू कॉलनी चौकाजवळून जात असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली जेव्हा रक्ताने माखलेला एक व्यक्ती हातात पिस्तूल घेऊन पळू लागला. त्याच्या गळातून रक्त वाहत होते. माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिस पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याला त्याने जखमी केले आणि त्याची पिस्तूल पळवून नेली. काही वेळाने या माथेफिरुला जमावाच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कृष्ण शेरवाल असे या तरुणाचे नाव आहे. 
 
16 मार्च रोजी एमएस पार्क पोलिस स्टेशनला 6:40 आणि 6:50 वाजता दोन पीसीआर कॉल आले की कृष्ण शेरवाल नावाच्या व्यक्तीने चाकूने स्वतःचा गळा चिरला आणि नाथूजवळील चाकू आणि पिस्तूल घेऊन सार्वजनिक ठिकाणी पळ काढला. दिल्ली पोलीस कंट्रोल रूमला सदर माहिती देण्यात आली. पोलिसांनी या तरुणाला समज देण्याच्या प्रयत्न केला असून हा तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केले. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेरवाल हे पत्नीपासून वेगळे झाले होते. यासोबतच तो डिप्रेशनचाही बळी आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. पोलिसांनी जमावाच्या मदतीने तरुणाला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
Edited By- Priya Dixit