शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (10:28 IST)

चिमुकल्याने धाडसाने पकडला भलामोठा अजगर

python
Twitter
सापाचं नाव जरी ऐकू आले तरीही भला मोठ्यांना घाम फुटतो.साप समोर आला तरीही अंगाचा थरकाप उडतो. पण या जगात अशी अनेक धाडसी लोक आहे. जे या सापांना हाताळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान मुलगा एका अजगराला वाचवताना दिसत आहे. ही घटना कर्नाटकातील कुंडपुराची आहे.  या व्हिडीओ मध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या पूर्ण ताकदीने एका अजगराला झुडुपातून बाहेर काढताना दिसत आहे.सर्व  गावकरी बघून बघत आहे तेवढ्यात गर्दीतून एक चिमुकला त्याचा मदतीला येतो.आणि त्याची अजगराला बाहेर काढण्यात मदत करू लागतो. तो कोणतीही भीती न बाळगता चिमुकलाअजगराचे तोंड धरतो.
 
नंतर अजगर त्यांना विळखा घालण्याचा प्रयत्न देखील करतो. शेवटी सर्पमित्रांनी त्याला पडकून सुरक्षित स्थानी नेऊन सोडले. हा व्हिडीओ sanjaysabka या अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit