शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (17:10 IST)

जीन्सच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट झाला , तरुणाचे हात पाय भाजले

सध्या उन्हाळ्याची तीव्रता संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. घराबाहेर पडणे अवघड झाले तर घरातही उष्णतेचे चटके बसतात. उष्णतेचा परिणाम माणसांसोबतच मोबाईलवरही होऊ लागला आहे. टाईट जीन्स घालून मोबाईल ठेवत असाल तर जरा सावध राहा, कारण अशीच एक घटना उज्जैनमध्ये घडली आहे, ज्यात जीन्सच्या खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन तरुण भाजला.
 
उज्जैनमध्ये राहणारे निर्मल पमनानी हे गंगा फुटवेअरच्या नावाने दुकान चालवतात. शहरातील निजातपुरा येथे त्यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी ते त्यांच्या दुकानावर बसले होते. त्याच्याकडे जीन्सच्या पुढच्या खिशात ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाइल होता. 
 
प्रचंड उष्णतेमुळे खिशात ठेवलेला मोबाईल अचानक गरम झाला. निर्मल हे कामात व्यस्त होते. मोबाईल प्रचंड गरम झाला आणि काही वेळाने अचानक खिशातील मोबाईलचा स्फोट झाला आणि जीन्सने पेट घेतला. यादरम्यान मोबाईल खिशातून बाहेर पडला.  
 
शेजारी बसलेल्या मित्राने तातडीने आग विझवली. मात्र, या घटनेत निर्मलची मांडी आणि हात भाजला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. असे असताना डॉक्टरांनी सांगितले की, शक्यतो रात्रभर मोबाईल चार्ज केल्याने अशी परिस्थिती निर्माण होते. ओव्हरचार्जिंगमुळे मोबाईल गरम होऊन स्फोट होतो. सूर्यप्रकाशामुळे मोबाईलही गरम होतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.