1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (14:51 IST)

तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात साप शिरला

यूपीच्या हरदोई येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेल्या तरुणाने सांगितले की, त्याच्या पोटात साप घुसला. हे ऐकून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले
उत्तर प्रदेशातील हरदोई मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन स्थितीत एक तरुण वेदनेने आक्रोश करत डॉक्टरांसमोर पोहोचल्याने खळबळ उडाली. तरूणाने रडायला सुरुवात केली आणि सांगितले की, शौच करत असताना त्याच्या पोटात प्रायव्हेट पार्टमधून साप शिरला 
 
बनियानी पुर्वा गावातील 25 वर्षीय तरुण सोमवारी सायंकाळी उशिरा शौचासाठी गावात गेला होता. तरुणाच्या भावाने सांगितले की, जेव्हा त्याचा भाऊ शौचास गेला होता. काही वेळाने तो ओरडत घरी आला आणि त्याच्या पोटात काळ्या रंगाचा किडा गेल्याचे सांगितले. साप शिरल्याची भीती त्यांनी व्यक्त केली, त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात आणले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मंदधुंद अवस्थेत होता.

तो झुडपात शौच करत होता. काही लाकूड आत शिरले होते, त्यामुळे रक्त वाहू लागले होते. तो दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्याला साप चावला आणि त्याच्या पोटात घुसला असा त्याला भ्रम होता. तपासात काहीही निष्पन्न झाले नाही.
 
Edited By - Priya Dixit