शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (15:26 IST)

केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली

election
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृत्वाखाली मंत्रिमंडळाने भारतात वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. बुधवारी झालेल्या बैठकीत मोदी मंत्रिमंडळाने देशात एकाचवेळी निवडणुका होण्याला मंजुरी दिली. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार मांडू शकते. 
 
माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या मुद्द्यावर 62 पक्षांशी संपर्क साधला होता आणि प्रतिसाद देणाऱ्या 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला, तर 15 पक्षांनी विरोध केला. हे अहवालानुसार, एकूण 15 पक्षांनी प्रतिसाद दिला नाही

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले होते की, भाजपच्या नेत्तृत्वाखाली एनडीए सरकार सध्याच्या कार्यकाळात वन नेशन वन इलेक्शन लागू करेल. हे आश्वासन भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या जाहीरनाम्यात दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक आहे.  
Edited by - Priya Dixit