1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. The young man killed five family members by shooting himself

तरुणाने कुटुंबातील पाच जणांची गोळ्या झाडून हत्या करून स्वतःला संपविले

सीतापूर जिल्ह्यात शनिवारी पहाटे पाच वाजता हृदयद्रावक घटना घडली. येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मतिमंद व्यक्तीने आपल्या कुटुंबातील पाच जणांची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रामपूर मथुरा पोलीस स्टेशन हद्दीतील पल्हापूर गावात राहणारे अनुराग ठाकूर (वय 42) यांनी आई सावित्री (65), पत्नी प्रियांका (40) आणि मुलगी अश्विनी (12), लहान मुलगी अश्वी (10) यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्याचा मुलगा अद्वैत (6) याला छतावरून फेकून दिले

यानंतर अनुरागने स्वत:लाही संपविले.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 
युवक अंमली पदार्थांचे व्यसनी होता. कुटुंबीयांना त्याला नशामुक्त केंद्रात घेऊन जायचे होते, यावरून रात्री वाद झाला. यानंतर सकाळी ही घटना घडली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 
पुढील लेख
बनावट चकमक प्रकरणात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन