सोमवार, 29 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (12:24 IST)

भीषण अपघात: धनबादमध्ये अनियंत्रित कार नदीत कोसळली, महिला आणि मुलांसह पाच जणांचा मृत्यू

Tragic accident: Uncontrolled car falls into river in Dhanbad
सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा कारवरील नियंत्रण सुटून कार नदीत कोसळली .
झारखंडमधील धनबादमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार नदीत कोसळली, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा कार वरून सुटला आणि कार नदीत कोसळून पाच जण ठार झाले .स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी  पाठवले आहेत.