मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 23 फेब्रुवारी 2026 (16:20 IST)

ट्यूशन टीचरने ९च्या विद्यार्थिनीला गर्भवती करून गर्भपात करण्यास भाग पाडले

Tuition teacher impregnates minor student
लखनौ: सुशांत गोल्फ सिटी सारख्या उच्चभ्रू परिसरात एका नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. घराच्या सुरक्षित वातावरणात शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षकानेच आपल्या वासनेपायी एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
 
शिकवणीच्या बहाण्याने हैवानियत
बिजनौर जिल्ह्यातील रहिवासी असलेले हे कुटुंब सध्या लखनौमध्ये स्थायिक आहे. आरोपी वीर सिंग यादव (मूळचा बांदा जिल्हा) हा मुलीला घरी येऊन शिकवत असे. २२ जानेवारी रोजी जेव्हा मुलीचे आई-वडील कामावर गेले होते आणि आजी घराबाहेर उन्हात बसली होती, तेव्हा वीर सिंगने घरात शिरून या १३ वर्षीय मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला.
 
कोणाला सांगितल्यास 'आयुष्य उद्ध्वस्त करण्याची' धमकी देऊन त्याने १२ फेब्रुवारीपर्यंत वारंवार तिच्यावर अत्याचार सुरू ठेवले.
 
बळजबरीने गर्भपात आणि धमकी
या अत्याचारांमुळे मुलगी गर्भवती राहिली. ही बाब समजताच आरोपीने तिला जबरदस्तीने काही औषधे देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. या प्रक्रियेमुळे मुलीची प्रकृती खालावली आणि शेवटी तिने धीर एकवटून आईला सर्व हकीकत सांगितली. पालकांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
 
राजकीय वलय आणि दहशतीचा वापर
पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी वीर सिंग यादव हा अत्यंत प्रभावशाली असल्याचे भासवत असे. तो स्वतःला समाजवादी पक्षाशी संबंधित असल्याचे सांगत असे.
 
राज्यातील दोन माजी मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो दाखवून तो लोकांना आणि पीडित कुटुंबाला धमकावत असे. याच दहशतीचा वापर करून त्याने इतके दिवस हे कृत्य चालू ठेवले. घटनेचे गांभीर्य ओळखून लखनौ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी काम करत आहेत.