गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच, राज्यातील पाच शहरांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. या योजनेत महाराष्ट्रतील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गावर 2500 रुपयात विमानप्रवास करता येणार आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची घोषणा केली. 
 
उड्डाण या योजनेनुसार तासभर प्रवासाच्या पहिल्या निम्या जागांसाठी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना 2500 रुपये मोजावे लागतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल. म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल. नांदेड- मुंबई, नांदेड - हैदराबाद, नाशिक -  मुंबई, नाशिक - पुणे, कोल्हापूर - मुंबई, जळगाव -मुंबई आणि सोलापूर - मुंबई उड्डाण योजनेच्या माध्यामांतून हे नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.