शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2017 (17:18 IST)

उज्ज्वला योजनेचे सर्वाधिक गॅस कनेक्शन देण्यात उत्तर प्रदेश अव्वल

उत्तर प्रदेशने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना सर्वाधिक गॅस कनेक्शन देण्यात बाजी मारली आहे. तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबत इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक ए. के. वर्मा यांनी ही माहिती दिली. या अंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 46 लाख गरीब कुटुंबाना स्वस्त गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. तर पश्चिम बंगालमध्ये 19 लाख आणि मध्य प्रदेशमध्ये 17 लाख स्वस्त गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 रोजी सुरु करण्यात आली.